बीड (़रिपोर्टर)ः- विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता सुरू असतांना आपले काम सोडून हलगर्जीपणा करणार्या दोन कर्मचार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील हा गुन्हा बांधकाम विभागातील कर्मचार्यांवर करण्यात आला.
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शासकीय विश्रामगृह सिल केले आहे. बीडचे विश्रामगृह देखील प्रशासनाने राजकीय व्यक्ती आणि इतर लोकांसाठी बंद केले आहे. मंगळवारी रात्री अविनाश पाठक विश्रामगृहावर भेटीसाठी गेले तेव्हा त्याठिकाणी इलेक्शन ऑबजरवरसाठी आरक्षीत असलेल्या खोल्यामध्ये इतर लोकांना थांबवल्याचे दिसून आले. रेस्टहॉऊस वार्यावर सोडून शाखा अभियंता अक्षय भागवत आणि मॅनेजर अकबर पटेल दोघेही गाय असल्याचे पाठक यांना दिसून आल्याने त्यांचा पारा चढला. त्यांनी तातडीने उपविभागाीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभीयंता यांना रेस्टहॉऊसवर ोलावून कानउघडनी केली. संतापलेल्या जिल्हाधिकारी यांनी संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानूसार भागवत आणि पटेल या देाघांवर मंडळ अधिकारी बाबासाहे तांदळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.