बीड :
बीड (रिपोर्टर): बीड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आलेल्या शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योतीताई मेटे यांनी आज श्रीक्षेत्र नारायणगड येथे 101 नारळ वाढवत नगदनारायणाचे दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केचला. मतदारसंघाच्या बुथ क्र. 1 असलेल्या फुलसांगवी येथे गावकर्यांना भेट देत प्रचार सुरू केला. राज्यभरातील शिवसंग्रामचे कार्यकर्ते बीडमध्ये डेरेदाखल झाले असून प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी ते उपस्थित होते.
अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांसह तब्बल 31 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योती मेटे यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आज त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. श्रीक्षेत्र नारायणगडावर जात त्याठिकाणी नगदनारायणाचे आशिर्वाद घेत 101 नारळ वाढवत हा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. नारायणगडावरून त्या थेट या मतदारसंघाचे क्र. एकचे बूथ असलेल्या फुलसांगवीत त्यांनी गावकर्यांसोबत चर्चा केली. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बीड जिल्ह्यातल्या शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांबरोबर राज्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.