बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये कोसल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन निघत आहे. बीडमध्ये बाजार समितीत कोसला विक्री करत असतात. यापूर्वी बीडमध्ये कोसल्याला चांगला भाव होता. मात्र आजस्थितीत कोसल्याचा भाव कोसळल्याने शेतकर्यात नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोसल्याला जालना येथे पूर्वीपासून मार्केट आहे. काही महिन्यांपासून बीड येथे कोसला खरेदी केला जात आहे. जालन्याला 662 रुपये तर बीडला 580 रु. किलोप्रमाणे कोसल्याची खरेदी सुरू असल्याने शेतकर्यात नाराजी व्यक्त केली जात आहे. जालन्यापेक्षा बीडमध्ये कमी भाव मिळत असल्याने शेतकरी या ठिकाणी कोसला विक्री करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.