शिरूर कासार (रिपोर्टर) पोलीस प्रशासन आणि जनतेमध्ये सुसंवाद असायला हवा. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोण आहेत? हे पोलिसांना माहित नसते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबाबत नागरिक आणि पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले. ते शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान बोलत होते.
आज पोलीस अधिक्षक ठाकूर यांनी शिरूर पोलीस ठाण्याला भेट दिली. या वेळी ठाण्याच्या अधिकार्यांसह पोलीस कर्मचार्यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ठाकूर म्हणाले की, पुर्वी पिढीला आई, वडील,गुरुजी युवा पिढीला मार्गदर्शन करायचे मात्र आता मोबाईलद्वारे सोशल मिडिया या युवकांना अधिकचे नक असलेले शिकवत आहे. त्यामुळे युवापिढी भरकटू नये ते वाममार्गाला जाऊ नये म्हणून त्यांच्याशि पालकांनी सुसंवाद ठेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पोलीस आणि सीमेवरील जवान हे दोन्हीही वर्दीवाले मात्र यांच्यात फरक आहे. सीमेवरील जवानांना त्यांचा शत्रू माहित असतो. कारण जो सीमेचे उल्लंघन करतो तो शत्रू मात्र पोलिसांना या समाजात वावरतांना समोर येणारा व्यक्ती कोण हे माहित नसते. त्यासाठी समाजाने अश्या लोकांची पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. म्हणजे काही वाईट घडण्याअगोदर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यामुळे पोलिसांना समाजात लपलेले चोर, विघातक कृत्य करणारे माहित होण्यास उशीर होतो. त्यामुळे समाजातील लोकांनी पोलीस पाटलांनी असे माहित असलेले लोक पोलिसांना दाखवून दिले पाहिजेत. म्हणजे या लोकांवर नियंत्रण राहील व समाजात तेढ निर्माण होणार नाही. यासाठी पोलीस व समाजातील लोकांत सुसंवाद गरजेचा आहे. यावेळी पोलीस उप विभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर,पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,सह पोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार,नगराध्यक्ष रोहिदास पाटील,उप नगराध्यक्ष प्रकाश देसरडा, माजी उप नगराध्यक्ष बाबुराव झिरपे, नगरसेवक नसीर शेख, अरुण भालेराव, तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष रामनाथ कांबळे, जेष्ठ पत्रकार विजयकुमार गाडेकर, गोकुळ पवार, सतिष मुरकुटे, अंगत पानसंबळ, मनोज परदेशी,संपादक अशोक जायभाये,तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.