दिंद्रुड (रिपोर्टर): संविधान दिनानिमित्त बनविण्यात आलेल्या परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीस तोडफोड करून डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज आंबेडकरी अनुयायांच्या वतीने दिंद्रुड (ता.माजलगाव) शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीची अस्मिता असून त्यांच्या संदर्भात जर कोणी अपप्रवृत्ती जनक, वादग्रस्त विधान किंवा दगडफेक अशा पद्धतीने कृत्य करत असेल तर हे कुठेतरी निषेधार्थ असल्याचे पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला 10 डिसेंबर रोजी परभणी येथे तोडफोड करण्यात आली असल्याने संबंधित घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी दिंद्रुड पोलीस स्टेशनला संबंध आंबेडकरी अनुयायांच्या वतीने आज दिंद्रुड कडकडीत बंद करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला .