दोन वर्षांपुर्वी लावलेले झाडे वनविभागाने जोपासलीच नाहीत
नुसते झाडे लावून फायदा काय?
बीड (रिपोर्टर) वृक्षसंवर्धन करण्यासाठी राज्यामध्ये दरवर्षी कृषी, वन विभागाच्या वतीने लाखो नवीन झाडांची लागवड केली जाते. या झाडांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र झाडे लावल्यानंतर त्याची जोपासना केली जात नाही. लावलेली झाडे पाणी टाकण्याविना खराब होतात. दोन वर्षांपुर्वी वनविभागाने जी झाडे लावली होती, त्यातील सत्तर ते ऐंशी टक्के झाडे जळून गेली. दोन लाखांपेक्षा जास्त झाडे वनविभाग लावणार आहे, आता तरी वनविभागाने या झाडांची जोपासना करावी, नुसताच झाडे लावण्याचा देखावा करू नये.
झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्याचे दुष्परिणाम आज पहावयास मिळत आहे. भविष्यामध्ये आणखी वाईट परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येणार आहे त्यासाठी आतापासूनच दक्ष राहून झाडांची संख्या वाढवण्याकडे राज्य सरकारने कल वाढवलेला आहे. दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये वनविभाग आणि कृषी विभागाच्या वतीने लावली जातात. झाडे लावल्यानंतर मात्र त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. झाडे लावल्यानंतर त्याची जोपासणा करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे मात्र वनविभाग नुसते कागदे काळे करण्यापलिकडे दुसरे काही करत नाही. यावर्षी पुन्हा झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. जिल्हाभरात वनविभाग 2 लाख झाडांची लागवड करणार आहे, हे झाडे रस्त्याच्या कडेला लावण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्याची जोपसणा करण्याचे काम वनविभागाने करावी नाहीतर नुसता झाडे लावण्याचा देखावा करू नये.
रस्त्याच्या कडेने दोन तीन वर्षांपुर्वी वनविभागाने जे झाडे लावले आहेत त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. एक वर्षभर वनविभागाने झाडांना टँकरद्वारे पाणी टाकले असते तर रस्त्याच्या कडेने सगळे झाडेच झाडे दिसून आले असते मात्र लावलेल्या झाडांपैकी तुरळक झाळेच आज जिवंत आहेत. पं.स.च्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून जाडे लावण्यात आले. यातही गुत्तेदारांना पोसण्याचे काम करून बोगस बिले उचलण्यात आली आहेत. झाडे लावण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत आहे, हे पैसे निव्वळ पाण्यात जात असल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षात जे काही झाडे लावण्यात आले आहे, त्याच्या खर्चाचा हिशोब केला तर नक्कीच झाडे लावण्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस येते. वृक्षसंवर्धनात समाजसेवकांसह काही सेवाभावी संस्था मात्र चांगलं काम करत असल्याचे दिसून येत आहे.