बीड (रिपोर्टर) काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात जाणीवपुर्वक ईडीला पुढे करून त्रास दिला जातोय. हे प्रकरण न्यायालयात सुरू असतानाही केवळ सुडबुद्धीने भाजप काँग्रेस नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे. याविरोधात बीड जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात जाणीवपुर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने केेंद्रातील मोदी सरकार लक्ष्य करत आहे. भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीपुर्वक काँग्रेस नेत्यांना त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याच्या निषेधार्थ बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खा. रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष राहुल सोनवणे, नवनाथ थोटे, मिनाक्षी पाडुळे, प्रवीणकुमार शेप, नारायणराव होके, भास्कर केदार, जयंत शेप, लक्ष्मण पवळ, श्रीनिवास बेदरे, दत्ता कांबळे, गणेश बजगुडे, परवेज कुरेशी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.