मनपा निवडणुका लवकर घ्या, ऑगस्टमध्ये महाराष्ट्र दौरा करणार
मुंबई (रिपोर्टर) ’’मी वर्षा सोडून जाताना महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होते. या अश्रूंचे मोल मला आहे. जनतेच्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका असा घणाघात शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईकर महापालिका निवडणुकीची वाट बघत आहेत. या निवडणुका लवकर घ्याव्यात. ऑगस्टमध्ये मी महाराष्ट्र दौरा करणार आहे असेही ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले, हिंदुत्वात फोडाफोडी भाजपने केला, मराठी माणसांत ते फुट पाडीत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होणार आहे. यासाठी माझी लढाई आहे. वचन पूर्ण केल्यानंतर मी दुकान बंद करणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे.मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी मी वर्षा सोडून अश्रूंचे मोल मला आहे. या अश्रूची किंमत मला आहे या विश्वासघातक्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. ते म्हणतात की, आम्हाला गद्दार म्हणू नका. मी कुठे त्यांना गद्दार म्हणतोय विश्वासघातकी म्हणत आहे. शिवसेनेचे तुफान लोकांच्या मनात हृदयात तुफान आहे. मराठी माणसांत फुट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबईचा वेगळा घात करण्याचा भाजपचा डाव आहे. दिल्ली मिळाली तरी त्यांना मुंबई हवी आहे. रावणाचा जीव बेंबीत अशी त्यांची मुंबईबाबत गत आहे. ’’फुटीरांचा जो आक्षेप आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली मग आज जे गावोगावी दिसते की काय आहे? आधी भाजपसोबत सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देत आहे. आता भाजप त्रास देतोय, आपल्याला खोटे ठरवतोय, आपल्यासोबत ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण मविआसोबत गेलो आता काँग्रेस राष्ट्रवादी त्रास देतेय असे ते म्हणतात मग अशा फुटीरांना हवे तरी काय..असा सवाल करीत शरद पवारांवरील आरोपांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खंडन केले.