दोघांच्याही आई-वडिलांवर गुन्हा दाखल
मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा
बीड, (रिपोर्टर) ः वय कमी असतानाही मुलीचे लग्न करण्यात आल्याने लग्नानंतर काही महिन्याने मुलीने आपल्या आई-वडिलासह मुलाच्या आई-वडिलाविरोधात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर मुलाविरोधातही अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना परळी शहरामध्ये घडली.
परळी शहरातील एका अल्पवयीन मुलीचे 2 जानेवारी 2025 रोजी लग्न लावून देण्यात आले होते. लग्नात मुलीचे वय 15 वर्ष होते. आपले कमी वयात लग्न लावून देण्यात आले, त्यामुळे मुलीने स्वतःहून आपल्या आई-वडिलासह मुलाचे आई-वडिल व मुलाविरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार कलम 106 कलम 10 बालविवाह, 64 (2) 65, 5(1), 6 बाललैगिक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा मात्र फरार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करीत आहे.