बीड (रिपोर्टर): बीड आगाराचा बसचालक आपल्या ताब्यातील बस ही चार्जींगसाठी घेऊन जात असताना बार्शी नाका परिसरात आरोपीने आपल्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो सदरच्या बसला आडवा लावून रहदारीस अडथळा करत बस चालकाला शिवीगाळ केली व लोखंडी रॉडने उजव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. यामध्ये बस चालक जखमी झाले. याच दरम्यान टेम्पो चालकाने बसच्या काचांची तोडफोड केल्याची घटना बार्शी नाका इमामपूर रोड लगतच्या प्रकाश आंबेडकर नगर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड आगाराचे बस चालक प्रताप कैलास पवार (वय 32 वर्षे) हे काल 4 वा.च्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत होते. त्यांच्याकडील ई बस क्र. एम.एच. 23 ए.यू. 6235 क्रमांकाची गाडी घेऊन ते चार्जींगसाठी जात होते. त्यांची बस बार्शी नाका चौक परिसरात आली. तेव्हा अशोक लेलँड टेम्पो. क्र. एम.एच. 44 यु. 3298 चा चालक रफिक लतिफ ऊर्फ बिल्डर याने आपल्या ताब्यात टेम्पो सदरील बसला आडवा लावला व रहदारीस अडथळा निर्माण करत बस चालकास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. टेम्पो चालक एवढ्यावर थांबला नाही तर त्याने ई बसच्या काचाही फोडल्या. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून सदरील टेम्पो चालकाविरोधात पेठ बीड पोलिसात गु.र.नं. 141/2025 कलम 132, 121 (1), 352, 324, (6) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.