लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना हजारोंच्या संख्येने अभिवादन
बीड (रिपोर्टर) कोणतीही शैक्षणिक इयत्ता पास न केलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य विश्वात भलेमोठे साहित्य लिहून आपले साहित्य आणि शाहिरीतून परिवर्तनवादी वर्ग लढ्याचा संदेश हयातभर दिला. अशा सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आज त्यांच्या पुतळ्याला मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत ) अभिवादन केले.
सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून श्रमिकांच्या वर्गलढ्याबाबत लिखान केले आहे. कामगारांच्या हक्कासाठी साहित्यासोबत त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. कोणतीही इयत्ता पास नसताना साहित्यामध्ये कादंबर्या, वगनाट्य, शाहिरी, प्रवास वर्णने, असे विपुल साहित्यांची भर घातली. अण्णाभाऊंची ओळख ही सत्यशोधक साहित्यिक सोबत कॉम्रेड म्हणूनही होती. त्यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहरात सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी गेले पाच दिवस विविध कार्यक्रम घेतले. आज सकाळी त्यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत मोठी ग्रंथदिंडी काढली. या ग्रंथदिंडीत महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. या ग्रंथदिंडीला सुशिलाताई मोराळे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या ग्रंथदिंडीला साहित्यिक प्रा. डॉ. मनोहर सिरसाट, चित्रपट दिग्दर्शक व्हि. सत्तू, अभिनेते निळकंंठ सावरगेकर, माजी नगरपालिका सभापती प्रेमलता चांदणे याही उपस्थित होत्या. अण्णाभाऊंना अभिवादन करत विजयसिंह पंडित, योगेश क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, विनोद हातागळे, बळीराम चांदणे, उत्तम पवार, मधुकर लोंढे, सुनिल सुरवसे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, प्रा. प्रदीप रोडे, सारिका क्षीरसागर, सुनिल पाटोळे, सुभाष लोणके, अॅड. प्रवीण राख, अॅड. गंडले आदी मान्यवर उपस्थित होते.