माजलगाव , रिपोर्टर : तालुक्यातील मौजे ब्राह्मगाव येथील शेतकऱ्याच्या जमिनी ऑन लाईन न झाल्याने ७ /१२ मिळत नसल्याने बँक कर्ज देत नाही आदी सह येथील शासनाच्या शेती विषयी विविध योजनांपासून वंचित राहत असल्याने आज येथील शेतकऱ्यांनी माजलगाव तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे
या विषयी माहिती आशी की , तालुक्यातील लऊळ येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही मौजे ब्राह्मगावच्या शिवारात आहे मात्र येथील संपूर्ण शिवार हा तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या हलगर्जीपणा ७/१२ ऑन लाईन नसल्याने अनेक वर्षांपासून पीक विमा , बँक कर्ज प्रकरणे ,सह इतर सुविधा पासून वंचित राहत असल्याने या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत याची बार बार सूचना करून ही तहसीलदार प्रशासनाने कुठली व्यवस्था न केलेल्या या गावाच्या शेतकऱ्यांनी आज दि ४ रोजी तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे चंद्रभान शिंदे ,बाळासाहेब मुंडे , अशोकराव नरवडे पाटील ,सुभाष घाडगे ,राम मुंडे ,गौतम मुंडे ,संतोष घाडगे ,कृष्णा घाडगे ,कैलास गोस्वामी ,विक्रम घाडगे ,सिद्धेश्वर कुरे ,दवानंद मुंडे आदी शेतकरी उपोषणास बसले आहेत.