1000 कुटुंबांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप
दिंद्रुड (रिपोर्टर) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त भारत सरकारने देशामध्ये हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याचे जाहीर केल्यानंतर तेलगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे युवानेते गोविंद भैया केकान यांनी याच धर्तीवर 1000 कुटुंबांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप करत तिरंगा ध्वज अभिवादन रॅली संपन्न केली.
तिरंगा अभिवादन रॅली ची सुरुवात देव दहिफळ येथे होऊन त्यानंतर ही अभिवादन रॅली दिंद्रुड संगम चाटगाव भोपा तेलगाव कोथिंबीरवाडी व शेवटी कारी येथील सिद्धेश्वर मंदिरात करण्यात आला.
या तिरंगा अभिवादन रॅलीमध्ये तेलगाव जिल्हा परिषद मधील सर्वच गावातील तरुणांनी खूप मोठ्या खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता तिरंगा अभिवादन रॅलीची भव्यता पाहून परिसरातील सर्वच गावांमध्ये देशभक्ती माय वातावरण तयार झाले होते.
तिरंगा अभियान रॅलीमध्ये तरुणा सह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावर होता या अभिवादन रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी व परिसरातील सर्वच पत्रकार हे देखील सहभागी झाले होते. अभिवादन रॅलीची भव्यता बघून परिसरामध्ये युवा नेते गोविंद भैया केकान यांचे सर्वत्र कौतुक होते.
ही अभिवादन रॅली यशस्वी करण्यासाठी गोविंद भैया केकान युवा मंच च्या सर्वच कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशाबद्दल राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी घोषित केलेले हर घर तिरंगा अभियान डोळ्यासमोर ठेवून तेलगाव जिल्हा परिषद सर्कल मधील गरजू कुटुंबांना तिरंगा ध्वजाचा वाटप करण्याचा संकल्प करून 1000 कुटुंबांना तिरंगा ध्वजाचे वाटप केले.
गोविंद केकान
(युवा नेते भारतीय जनता पार्टी )