गेवराई (रिपोर्टर) अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले नवविवाहितेचे 7 तोळ्याच्या दागिण्यासह 3 लाख रुपये लंपास केल्याची घटना गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथे आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली. तालुक्यात चोर्या, घरफोडीचे सत्र सुरुच असून गेवराई पोलिस केवळ चोरी झाल्यावर पंचनामा करण्यापुरतेच आहेत की आय? असा प्रश्न उपस्थित होत असून. तालुक्यातील नागरिक भयभित झाले आहेत.
गणेश वैजिनाथ ढाकणे हे आपल्या कुटुंबीयासह मिरकाळा येथे राहत आहेत. गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांच लग्न झालेले आहे. घरात नवविवाहितेचे 7 तोळ्याचे दागिणे होते. तर 3 लाख रुपयाची कॅशही होती. ढाकणे कुटुंबीय शनिवारी रात्री जेवन करुन झोपले होते. ज्या खोलीत हे दागिणे आणि कॅश ठेवली होती ती खोली बाहेरुन कुलूप लावून बंद करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री घराचे मेन गेट तोडून घरात प्रवेश केला. बंद रुमचे कुलूप तोडून कपाटातील सात तोळे सोण्याचे दागिणे आणि रोख 3 लाख रुपये लंपास केले. सकाळी ढाकणे कुटुंबीय झोपेतून उठल्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती गेवराई पोलिसांना दिली. त्यानंतर गेवराई ठाण्याचे प्रमुख पो.नि. रविंद्र पेलगुरवार, सहायक पोलिस निरिक्षक साबळे,पीएसआय घाडगे यांनी भेट दिली.