बीड (रिपोर्टर) अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असून कर्मचार्यांच्या मागण्या तात्काळ सोडवण्यात याव्यात यासाठी आज अंगणवाडी कर्मचार्यांनी जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागावर मोर्चा काढून तिव्र निदर्शने केली. या आंदोलनात सर्व कर्मचार्यांचा सहभाग होता.
अंगणवाडी सेविकांना आजच्या दरानुसार सीम रिचार्जचा आघाव निधी देण्यात यावा, सध्या 84 दिवसाकरीता 720 सिम रिचार्जकरीता सेविकांना खर्च करावे लागतात. 3 ते 6 वयोगटातील लाभार्थींना दोन वेळचा नाष्टा व ताजा गरम आहाराकरीता फेडरेशनतर्फे आहार पुरवले जाते. फेडरेशनतर्फे देण्यात येणारे आहार निकृष्ट दर्जाचा असून अख्खा गहू देण्यात येतो, त्या गव्हाचा भरडा करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकावर सोपवण्यात येते. अंगणवाडी
कर्मचारी एकाचवेळी शंभर ते दोनशे किलोच्या गव्हाचा भरडा करू शकत नाही. भरडा करण्यासाठी निधी कुठून आणायचा? याची माहिती प्रकल्प कार्यालय देत नाही. म्हणून अंगणवाडी केंेद्रातील लाभार्थ्यांना चांगला आहार व भरडा केलेला गहू देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी आज अंगणवाडी कर्मचार्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी सुरेमनी गायकवाड, संध्या मिश्रा, अनुसया वायबसे, सिंधु घोळवे, शेख इरफाना, ज्योत्साना नानजकर, मोगरकर, कुलकर्णी वंदना यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीनेही मोर्चा
अंगणवाडी कर्मचार्यांच्या विविध मागण्यासाठी आज दोन संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. सदरील हा मोर्चा भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभावती गायकवाड व कमल बांगर यांनी काढला. यावेळी सचिन आंधळे, दत्ता देशमुख यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.