पाटोदा ( रिपोर्टर ) भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जणकल्याणकारी योजना सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाच्या निमित्तानेपाटोदा नगरपंचायत अंतर्गत उद्या दिनांक 25/9/2022 रविवार रोजी दुपारी ठीक 4 वाजता एकुण 8 कोटी 57 लक्ष रुपयांच्या शहरातील,वाड्या वस्त्या वरील काही सिमेंट काँक्रेट रस्त्याचे लोकार्पण सोहळा व नविन सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्याचा शुभारंभ आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष, गटनेते, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती व सर्व नगरसेवक यांनी केले आहे.
गेल्या पाच वर्षांत आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नातून पाटोदा नगरपंचायत अंतर्गत मागेल त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल,रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल, वाड्या वस्त्याला सिमेंट काँक्रेट रस्ते,सभागृह अशा प्रकारचे अनेक कामे झाली असून उद्या दिनांक 25/9/2022 रविवार रोजी दुपारी ठीक 4 वाजता माऊली नगर येथील सिमेंट काँक्रेट रस्ता,प्रभाग क्रमांक 4 मधील बर्डे वस्ती अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ता व बिनवडे वस्ती सिमेंट काँक्रेट रस्त्याचे लोकार्पण तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील 1 कोटी 75 लक्ष रुपयांचे राऊत वस्ती ते रेणुका माता सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे,प्रभाग क्रमांक 14 मधील 40 लक्ष रुपयांचे सुर्यभान जाधव यांच्या घरापासून ते लामजे यांचे घर पाट रस्ता व नाली बांधकाम करणे,हिंदू स्मशानभूमी 80 लक्ष रुपयांचे जोड रस्ता सिमेंट काँक्रेट करणे,प्रभाग क्रमांक 13 मधील मंगेवाडी अंतर्गत 50 लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 14 मधील 50 लक्ष रुपयांचे तुपे यांचे घर ते ङ्गाटे यांचे घर सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 40 लक्ष रुपयांचा सिमेंट काँक्रेट रस्ता करणे, प्रभाग क्रमांक 14 मधील 50 लक्ष रुपयांचे संदीप जावळे यांचे घर ते बबन वीर यांचे सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 14 मधील 50 लक्ष रुपयांचे रामेश्वर जाधव यांचे घर ते गुंड यांचे घर ते धवन यांचे घर सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकाम करणे,55 लक्ष रुपयांचे पढीयार स्वीट होम ते मार्केट कमिटी सिमेंट काँक्रेट रस्ता करणे, प्रभाग क्रमांक 14 मधील 20 लक्ष रुपयांचा प्राध्यापक कॉलनीकडे जाणार सिमेंट काँक्रेट रस्ता करणे, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 10 लक्ष रुपयांचे मुख्य रस्ता माऊली नगर ते ससाणे यांचे घर सिमेंट काँक्रेट रस्ता करणे,प्रभाग क्रमांक 1 मध्ये 20 लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, अल्पसंख्याक योजनेअंतर्गत इदगाह टेकडी सिमेंट काँक्रीट रस्ता करणे 15 लक्ष रुपये,भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 20 लक्ष रुपयांचे प्रभाग क्रमांक 5 सय्यद नगर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे,प्रभाग क्रमांक 14 मध्ये 30 लक्ष रुपयांचे माऱोती मंदिराजवळ परिसर मध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 35 लक्ष रुपयांचे बाबा कुरेशी ते अयशा मज्जिद सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे व प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत 20 लक्ष रुपयांचे कुचेकर यांचे घर ते टेकाळे यांचे घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे अशा एकूण 8 कोटी 57 लक्ष रुपयांचा कामाचा लोकार्पण सोहळा व नविन सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाचे भुमिपुजन आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,गटनेते, सर्व सभापती व सर्व नगरसेवक यांनी केले आहे.