बीड (रिपोर्टर) शिवसेनेमध्ये तन मन धनाने काम करत असताना उध्दव ठाकरे हे शिवसैनिकाला अडचणीत आणण्याचे काम करतात. मी शिवसेना त्यांच्यामुळेच सोडली. शिवसेना सोडल्यानंतर माझ्या बंगल्यावर ठाकरेंनी गुंड पाठवले. असा आरोप शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला. ते त्यांच्या निवासस्थानी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. दसरा मेळाव्याला बीडमधून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. यानिमित्त त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकाला दसरा मेळाव्या निमित्त मुंबई येथील बी.के.सी. ग्राऊंडवर मार्गदर्शन करणार आहेत. हा दसरा मुळावा अभूतपूर्व असाचा होणार असून बीडमधून हजोरो शिवसैनिक जाणार असल्याचे माजी मंत्री प्रा.सुरेश नवले यांनी सांगितले. ते त्यांच्या निवासस्थानी अयोजीत पत्रकार परिषदमध्ये बोलत होते.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळूक यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना नवले म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहे ठाकरे आणि स्व. आनंद दिघे साहेब यांना अपेक्षित असणारे हिंदुत्व, शिवसेना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबई मध्ये के.बी.सी. ग्राऊंडवर दिलेस. या मेळाव्याला बीड जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. शिसैनिकामध्ये दसरा महामेळाव्या विषयी प्रचंड उत्सुकता आणि आस्था आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणारा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. म्हणून अपूर्व आणि अभूतपूर्व असाच हा दसरा मेळावा होणार आहे. महामेळाव्याला भगवा सागर, अरबी समुद्राशी स्पर्धा करेल असेच या महामेळाव्याचे वणृन करावे लागेल असे ही ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हाणाले की, मी बीड विधानसभेची तयारीक करत आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले खांडे देखील इच्छुक आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले आमचे नेते जे ठरवतील ती पूर्व दिशा असेल. मी उध्दव ठाकरे यांच्यामुळेच शिवसैना सोडली असेही यावेळी प्रा. नवले म्हणाले.