शिवाजीराव दादा पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन मोहत्सवाची उत्साहात सांगता
गेवराई (रिपोर्टर) मराठवाडा ही संतांची भूमी आहे. माणसाला माणुसकीचा आकार देण्याचे तत्वज्ञान संतामध्ये आहे, प्रकाशमय जीवन बनवण्यासाठी साधना महत्त्वाची आहे, आज याच साधनेचे संचित म्हणून हा कीर्तन सोहळा होत आसून राजकारणच्या माध्यमातून शिवाजीराव दादांनी समाजकरण ही साधना केली आणि यातून दादांना संत महंत, अन समाजाचे आशिर्वाद मिळाले आसल्याचे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी केले. गेवराई तालुक्याचे शिल्पकार माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या भव्य किर्तन महोत्सवाची श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या अमृत तुल्य काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आज जीवनात समाधान आणि आनंद मिळवायचा असेल तर हरीनाम घेतले पाहिजे, समाधान पैशात नाही तर या मंडपात आणि उत्सवात आहे. जीवनात समाधान मिळवण्यासाठी भगवंताची सेवा करण्याची गरज आहे. तशीच सेवा आपल्या राजकीय जीवनात शिवाजीराव दादांनी नगद महाराज आणि चकरवाडीच्या माऊली दादांची निस्सीम सेवा केली. म्हणून आज हा आनंद सोहळा त्यांना
अनुभवायला मिळत आहे. याच सेवेच्या आशीर्वादाच्या माध्यमातून दादा या तालुक्याचे शिल्पकार बनले. दादांनी शिक्षण, सहकार, समाज या क्षेत्रात मोठे काम केले व आज त्यांचे तीनही मूले अमरसिंह, जयसिंह आणि विजयसिंह हे तालुक्यातील समाजाची सेवा करत आहेत. दादांनी राजकारणच्या माध्यमातून ल समाजकरणाची साधना केली आणि यातून त्यांच्या कुटुंबियांना संत महंत, अन समाजाचे आशिर्वाद मिळाले आसल्याचे महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी सांगत त्यांचे पुढील जीवनही आनंदी जावो असे आशीर्वाद दिले. या प्रसंगी शिवाजीराव दादा, अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांच्यासह सर्व परिवार व भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी हभप कृष्णा म.राऊत, संगीत विशारद तुळशीराम आतकरे, विजयकुमार ठोसर, संगीत अलनकार हरीश गवते, यादव महाराज, मृदंगचार्य गणेश महाराज लोंडे यांच्यासह त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी यांनी साथ दिली.