भर पावसात आ.बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे,उ.वि.अधिकारी कुदळे, तहसिलदार गुंडमवार, गटविकास अधिकारी मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर
आष्टी ( रिपोर्टर ):-
तालुक्यातील सोलेवाडी पांढरी आष्टा सह परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊन परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे.शेती व पिके वाहुन गेली आहेत.काही ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सोलेवाडीचा पुल वाहून गेला तर खंडु झगडे या शेतकऱ्यांच्या ४ हजार कोंबड्या वाहून गेल्या नुकसान झालेल्या या भागात आ.बाळासाहेब आजबे यांनी उपविभागीय अधिकारी तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन आज दि.१४ रोजी भर पावसात भिजत चिखल तुडवत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत नुकसान ग्रस्तांना धिर दिला
आष्टी मतदार संघात सतत मागिल चार दिवसांपासून परतीचा आभाळ फाटल्यासारखा पाऊस चालू आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, शासनाने पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी आ.बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.ते शुक्रवारी दुपारी ११ वाजता आष्टी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीची सोलेवाडी व पांढरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनभर पावसात पिकांची झालेल्या नुकसानीची आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे तहसीलदार विनोद गुंडमवार गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे कृषी अधिकारी गोरख तरटे जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे सरपंच अशोक पोकळे यांच्या उपस्थितीत सोलेवाडी पांढरी येथे भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी केली व तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल पाठवण्याचे सांगितले तर सोलेवाडी येथे शेतकऱ्यांच्या ४००० कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या त्या ठिकाणी आ आजबे व प्रशासनातील अधिकारी यांनी शेड वर जाऊन पाहणी केली