; भाजपाच्या मुरजी पटेलांनीही शक्ती प्रदर्शनात
दाखल केला अर्ज
मुंबई (रिपोर्टर) उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेची खरडपट्टी काढत ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर आज मुंबई महापालिकेने लटकेंचा राजीनामा स्वीकारला. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. ठाकरे गटाकडून स्व. लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या मोठ्या शक्ती प्रदर्शनात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून भाजपाकडून पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी आपला उमेदावरी अर्ज आज दाखल केला. या वेळी मुरजी पटेल यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजपाचे नेतेआशिष शेलार यांच्यासह अन्य लोक उपस्थित होते. सदरची निवडणूकअत्यंत चुरशीची आणि लक्षवेधक होणार असल्याने मुंबईसह अवघ्यामहाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेले शिंदे गट यांचे आणि ठाकरे गट यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून तू तू मै मै हातेाना दिसून येते. भाजपाच्या सहकार्याने सत्तेत असलेल्या शिंदे गटाने प्रत्येक वेळा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे काम केले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोयनिवडणुकीसाठी स्व. लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेनेने केली. मात्र मुंबई महापालिकेत नोकरीला असलेल्या लटकेंचा राजीनामा जाणीवपुर्वक महापालिका स्वीकारत नव्हती. शेवटी त्यांना काल उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी लागली. न्यायालयाने महापालिकेची खरडपट्टी काढल्यानंतर आज सकाळी लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यात आला. दुसरीकडे रात्रीच शिंदे गटाने या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाने मुरजी पटेल यांच्या उमेदवारीची घोषणा केली. आज सकाळी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरसह अन्य मंत्री, आमदार उपस्थित होते. दुसरीकडे ऋतुजा लटके यांनी दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनात सदरच्या निवडणुकीचे चित्र उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. ऋतुजा लटके यांच्या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली असून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीतून शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे भविष्य समोर येणार आहे. अवघ्या काही दिवसात मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असून ही निवडणूक मुंबई पुरतीच मर्यादीत नसून या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागून