बीड (रिपोर्टर)ः- गजानन सुतगिरणीवर कामाला असणार्या झारखंडच्या मजुरांना बोअरच्या पाण्यातून विषबाधा झाल्याची घटना रात्री घडली. यासर्व मजुरांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मजुरांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी प्राथमीक आरोग्य केंद्राची टिम दाखल झाली होती. यात एकूण 20 पेक्षा जास्त मजुरांना विषबाधा झाली होती.
ईट फाटा येथील गजानन सुत गिरणीवर झारखंड राज्यातील काही मजुर कामाला आहे. रात्री सदरील मजुर बोअरचे पाणी पिले होते. पाणी पिताच काही मिनीटांनी मजुरांना उलटी, संडासचा त्रास होवू लागला. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जवळपास 20 पेक्षा जास्त मजुर दाखल करण्यात आले होते. यामध्ये अजय पंडीत, नवलेश कौल, कलम राम, चंदन मंडल, रमेश कुमार, संतोष कुमार, चंदन माली, मोहन मुरूम, पिंटू, सुनील राजवर, विकास मंडल यासह आदिंचा सहभाग आहे. आज सकाळी मजुरांची प्रकृती स्थिर होती. बोअरचे पाणी दुषीत होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्राथमीक आरोग्य केंद्राची टिम घटनास्थळी दाखल झाली होती.