केज (रिपोर्टर) केज शहरामध्ये दोन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेचा तपास पोलीसांनी लावला असून चोरट्याकडून जो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. तो मुद्देमाल ज्यांचा होता त्यांच्याकडे स्वाधीन करण्यात आला आहे.
29 सप्टेंबर रोजी केज शहरातील क्रांतीनगर भागात राहत असलेल्या सुरेखा श्रीराम दांगट आणि त्यांचे नातेवाईक सुनीता मधुकर मोरे, द्वारका बाबुराव मोरे या सकाळी 11 च्या सुमारास धारुर तालुक्यातील अंबाचोंडी देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्या केज शहरातील बसस्थानकातून धारुर कडे जाणार्या बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुरेखा दांगट यांच्या गळ्यातील 75हजार रुपय किमतीचे 16 ग्रँमचे सोन्याचे मिनी गंठन तोडून घेत पळ काढला होता. केज पोलीसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांनी सिसिटीव्ही फुटेज द्वारे तपास केला असता. तोंडाला स्कार्प बांधलेल्या दोन महिलांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निर्दशनास येताच पोलीसांनी त्यांचा तपास सुरू केला. चोरी केल्यानंतर त्या दोघी येळमाळ्याला गेल्या आणि त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी परत बीडकडे जाण्यासाठी केज येथे आल्याची माहिती पोलीसांना समजताच त्यांनी सापळा लावला आणि मंगल सतिष तुसांबर रा.पेठ बीड आणि केसरबाई सुखदेव जाधव रा. नाळवंडी नाका बीड या दोघींना बसस्थानकांजवळील हॉटेल बसंत बहार समोरुन ताब्यात घेण्यात आले. तपासी अधिकारी श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याकडून चोरलेले गंठन हस्तगत केले. तसेच अन्य एका प्रकरणी 21 सप्टेंबर रोजी धरमाळा तालुका केज येथील शेतकरी दिनकर सखाराम गोडसे यांनी त्यांच्या शेतातील कोंबीचे पिक विकल्यानंतर आलेली रक्कम घेवून ते दुकानदाराची उधारी देण्यासाठी जात असतांना रस्त्यात पाऊस येत असतांना थांबले होते. त्यांच्या एका हातात बाजाराची पिशवी आणि बगलेत पैसे आणि मोबाईल ठेवलेली बॅग होती. त्या दरम्यान कानाडी रोड केज जवळच्या जुन्या सरकारी दवाखान्याच्या रस्त्यावर त्यांना दशरथ पवार यांने बोलण्याचा बहाना करुन थांबवले. मागून अरुण काळे यांने धक्का मारुन धारदार वस्तूने बगलेतील बॅग कापून त्यातील 49 हजार 500 रुपये व दोन मोबाईल लंपास केले होते. या प्रकरणी चौधरी यांनी तपास करुन दशरथ पवार, अरुन काळे यांना ताब्यात घेवून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल हस्तगत केले. 1 नोंव्हेबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सुरेखा दांगट आणि दिनकर गोडसे यांना पोलीस ठाण्यात बोलावून गंठन आणि रोख रक्कम, मोबाईल त्यांच्या ताब्यात दिला. यावेळी जमादार राम यादव, पोलीस नाईक तांदळे आणि पंच उपस्थित होते.