बीड(रिपोर्टर) बीड शहरामध्ये 26 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलन अध्यक्षपदी पौलस वाघमारे यांची नियूक्ती करण्यात आलेली आहे. या संमेलनामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आशिष शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.
संमेलनाच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, दि.6 ते 8 नोव्हेंबर 2022 दरम्रान बीड रेथे संपन्न होणार आहे. पुण्राचे लेखक साहित्रिक पौलस वाघमारे हे अध्रक्षस्थान भूषविणार आहेत. बीड ख्रिस्ती साहित्र संघाने रा संमेलनाचे निमंत्रण दिले असून अल्फा ओमेगा महासंघाचे प्रदेशाध्रक्ष आशिष शिंदे हे रा संमेलनाचे स्वागताध्रक्ष आहेत. साहित्यसंमेलन रेव्ह.नारायण वामन टिळक साहित्य नगरी असेम्ब्लीज ऑफ गॉड चर्च बसस्टॅन्ड समोर बीड याठिकाणी होणार आहे.
रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून प्रतिनिधींचे आगमन होणार असून दुपारी 12:30 ते 2:30 पर्रंत बीड शहरातून ग्रंथदिंडीचे आरोजन करण्रात आले आहे. सारंकाळी 4 वाजेपासून संमेलनाच्रा मूख्र उद्घाटन समारंभाला सुरूवात होणार असून रात स्थानिक राजकीर नेते, पुढारी खिस्ती साहित्र संमेलनाचे आजीमाजी अध्रक्ष उपस्थित राहणार आहेत. रामध्रे पुस्तक तसेच संमेलनाच्रा स्मरणिकेचे प्रकाशनही करण्रात रेणार आहे. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका मृदूला घोडके रा करणार आहेत. रावेळी सोलापूरचे साहित्रिक सतिश गडकरी हे सुवार्ता प्रसार रा विषरावर अनुभव कथन करणार असून स्वरलता आंग्रे रा बारबलमधील अभिषिक्त पिता रा विषरावर मनोगत व्रक्त करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान इतरही मान्यवरांचे मनोगत यामध्ये होणार आहेत.