बीड (रिपोर्टर) राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदिर पर्यंतच्या 800 मीटरच्या रस्त्याचे काम दोन दिवसापूर्वी सुरू केले होते. पडलेले खड्डे आधी बुजवून त्यावर हॉटमिक्स लेअर टाकण्यास आज प्रत्यक्ष सुरूवात केली. येत्या दोन दिवसात हे काम पूर्ण होवून नागरिकांना रहदारीसाठी रस्ता पुर्ववत सुरू होणारअसल्याचे सांगून आ.संदिप क्षीरसागर यांनी रखडलेले रस्त्यांचे कामांसह अन्य विकासकामांना जास्तीत जास्त निधी मिळवून शहरात विकासाची गंगा वाहती ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
बार्शी रोडवरच्या 800 मीटर रूंदीच्या कामाची आज प्रत्यक्षात सुरूवात झाली. राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदिर या भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्या खड्डे पडलेले होते. दोन दिवसापूर्वी हे सर्व खड्डे आधी बुजवण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्षात हॉटमिक्स लेअर टाकण्यात येत असून हे काम येत्या दोन दिवसात पूर्ण होणार असल्याचे आ.संदिप क्षीरसागर यांनी सांगितले. सदरचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार पध्दतीने करण्याहेतू आ.क्षीरसागर थेट रस्ता कामाच्याठिकाणी आज सकाळी भेट देण्यासाठी गेले. प्रत्यक्ष उभा राहून त्यांनी हे काम सुरू ठेवले. पुढील काही दिवसात रखडलेले रस्त्याचे अन्य कामे पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. शासनदरबारी अनेक रस्त्यांच्या कामाला सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र रस्त्याच्या आणि विविध विकास कामांना लवकरच निधी मिळवून मंजूरी मिळावी यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचेही आ.संदिप क्षीरसागरांनी यावेळी म्हटले. बीड शहरासह ग्रामीण भागात जास्तीत जास्त विकास कामे करणे, लोकहिताचे कामे करणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.