बीड (रिपोर्टर) मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा मोठा बोलबाला करत शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्यात या योजनेअंतर्गत तब्बल 9350 कामे प्रस्तावीत असताना प्रत्यक्ष मात्र केवल 584 कामेच सुरू असल्याने इतर रस्ते कधी होणार? असा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.
शासनाच्या मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 9350 कामे प्रास्तावित असताना केवळ 2 हजार 73 कामे मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त 674 कामांनाच प्रशासकीय मान्या मिळाली. त्यातील केवळ 638 कामांची स्थळ पाहणी झाली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ 586 कामांनाच कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तर 584 कामे सुरू झाले आहेत. त्यामुळे केवळ 23 टक्केच काम पुर्ण झाल्यामुळे ग्रामीण भागात ही योजना मृगजळ ठरू पाहत आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना आपला माल बाजार पेठेपर्यंत नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. प्रस्तावीत कामे सुरू करून कागदोपत्री कामे दाखवून शासनाची दिशाभूल करणार्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांना दिले आहे.