वैद्यकीय क्षेत्रामध्ये मराठवाड्यात त्यांनी केले होते भरिव कार्य
बीड(रिपोर्टर): आष्टी शहराचे सुपूत्र अमेरिका येथे स्थायीक असलेले डॉ.मिर्झा अजमतुल्ला बेग यांचे काल वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. डॉ.मिर्झा अजमतुल्ला बेग हे आष्टी शहरातील जुन्या पिढीतील वकील मिर्झा हश्मातुल्ला बेग यांचे मोठे चिरंजीव होते. तर माजी शिक्षण सभापती मिर्झा मियामत बेग यांचे मोठे बंधू होते. त्यांनी जुन्या काळामध्ये वैद्यकीय शिक्षण पुर्ण करून औरंगाबाद, सिल्लोड, परभणी या ठिकाणी भरीव असे वैद्यकीय क्षेत्रात काम केले. गोरगरीबांची निशुल्क सेवा केली. ते अत्यंत मनमिळावू व दानशुर वृत्तीचे ख्याती असलेले व्यक्तीमत्त्व होते. त्यांचा दफनविधी काल शुक्रवारी अमेरिका येथील कब्रस्तानमध्ये करण्यात आला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ.मिर्झा अजमतुल्ला बेग यांच्या पश्चात दोन भाऊ, बहीणी, तीन मुले, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या वैद्यकीय कार्याचा मराठवाड्याला चांगला फायदा झालेला आहे. ते बीड येथील कॉन्ट्रॅक्टर सय्यद रिझवानभाई यांचे मोठे मामा होते. बेग कुटुंबियांच्या दु:खात दै.रिपोर्टर परिवार सहभागी आहे.