बीड (रिपोर्टर)ः- कर्जबाजारी पणाला कंटाळून एका 55 वर्षीय शेतकर्यांने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना कुक्कडगांव येथे घडली आहे.
कोंडीराम राजाराम खंडागळे वय-55 वर्ष या शेतकर्याकडे कर्ज होते. या कर्ज बाजारी पणामुळे ते नैराश्यतेत होते.पहाटे तिन वाजता त्यानी आपल्या राहत्या घरी विषारी औषध पिवून त्यांनी आत्महत्या केली.
—
वर्षभरात 269 शेतकर्यांची आत्महत्या
बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. दरवर्षी 200 पेक्षा जास्त शेतकरी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आपले जीवन संपवतात. यंदा 269 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 59 आत्महत्या वाढल्या आहेत.