बीड (रिपोर्टर) कर्तव्य कठोर म्हणून सुपरिचीत असलेल्या श्रीमती निता अंधारे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शासनाने बीड नगरपालिकेचा कार्यभार सोपवला असून मुख्याधिकारी म्हणून निता अंधारे यांनी आज आपला चार्ज स्वीकारला आहे. शहरातील वेगवेगळ्या प्रश्नांसह सर्वसामान्यांचे काम तात्काळ सोडवण्यास कटिबद्ध असलेल्या निता अंधारे यांच्याकडे बीड नगरपालिकेचा कार्यभार आल्याने सर्वसामान्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे तर दुसरीकडे राज्यपालाच्या आदेशावरून तत्कालीन मुख्याधिकारी गुट्टे यांना परभणी महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्तव्यदक्ष, कर्तव्यकठोर म्हणून प्रशासन व्यवस्थेत सातत्याने सुपरिचीत असलेल्या श्रीमती निता अंधारे यांना राज्य शासनाने बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज निता अंधारे यांनी नगरपालिकेमध्ये येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. निता अंधारे या कर्तव्यकठोर शासकीय-प्रशासकीय कामासह सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य देणार्या अधिकारी म्हणून सुपरिचीत आहेत. शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांसह सर्वसामान्यांची कामे तात्काळ तडीस नेण्यास त्या सातत्याने आघाडीवर असतात. आज त्यांनी बीड न.प.च्या मुख्याधिकारी म्हणून चार्ज स्वीकारला. आधीचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांना कार्यमुक्त करण्यात आले असून अद्याप त्यांना कुठेही पोस्टींग देण्यात आली नाही मात्र तत्कालीन मुख्याधिकारी गुट्टे यांना परभणी महानगर-पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे.