वाहन धारकांचे हप्ते थकले, प्रशासनाचे दुर्लक्ष
बीड (रिपोर्टर) प्रशासकीय काम आणि सहा महिने थांब अशी एक म्हण आहे. या म्हणीनुसार प्रशासनाचा काम चालतो. कोरोनाच्या कार्यकाळात काही खासगी वाहने अधिग्रहीत करण्यात आले होते. या वाहनांचे अद्यापही बील काढण्यात आले नाही. पैशाअभावी वाहन मालकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागू लागले. अनेकांचे बँकेचे हप्ते थकले. वेळोवेळी मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले. या वाहनधारकांनी शेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. 25 जानेवारीपर्यंत पैसे न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
कोरोनाचा काळ संकटाचा होता. या दरम्यान प्रशासनावर प्रचंड ताण होता. प्रशासनाने बीड जिल्ह्यात काही वाहनांचे अधिग्रहण केले होते. यामध्ये एसआरटी अंबाजोगाईच्या रुग्णालयासह पोलीस प्रशासनाकडे खासगी गाड्या अधिग्रहीत केले होते. कोरोनात जिल्ह्यातील अनेक रुग्ण मरण पावले होते. मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी या गाड्यांचा उपयोग करण्यात आला होता. कोरोनाचा कार्यकाळ संपून जवळपास दीड महिने झाले. अद्यापही या गाडी मालकांना प्रशासनाने बील अदा केले नाहीत. बिला संदर्भात अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे तगादा लावण्यात आला, विनंती करण्यात आली मात्र या विनंतीकडे डोळेझाक करण्यात आली.चालक-मालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. 25 जानेवारीपर्यंत बील अदा न केल्यास त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशाा शेख जमीर, अक्षय वायकर यांच्यासह आदींनी दिला आहे.