डीवायएसपीच्या मर्जीतल्या वर्दीची मनमानी
कॉन्स्टेबल बाळासाहेब फडच्या अनेक तक्रारी
अधिकार्यांची भीती दाखवून अरेरावी
छोट्या प्रकरणाला मोठं करण्याची फडकडून सातत्याने कुरापत
परळी (रिपोर्टर) कर्तव्य कठोर म्हणून सुपरिचीत असलेले पोलीस उपअधिक्षक धिरजकुमार यांच्याकडे अंबाजोगाई विभागाचा पदभार आल्यापासून त्यांच्या पथकातील कॉन्स्टेबल बाळासाहेब फड हे जास्त फडफड करताना दिसून येत असून डीवायएसपी धिरजकुमार यांच्या कर्तव्य कठोरतेचा गैरफायदा घेत लोकांना संबंधित कर्मचारी धमकावत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. तर छोट्या-मोठ्या प्रकरणाला वरिष्ठांकडे चुकीची माहिती पुरवून मोठं प्रकरण करत गुन्हा दाखल करण्याहेतू साधताना दिसून येत असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून मलिद्याच्या ठिकाणी बसून असलेल्या फडची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत अधिक असे की, परळी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. बाळासाहेब फड हे सातत्याने वादग्रस्त ठरतात. एखाद्या पोलिसाची बदली ही तीन वर्षात होते, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून फड हे एकाच ठिकाणी स्थान मांडून आहेत. वरिष्ठ अधिकारी अथवा राजकीय दबावातून ते आपल्या स्थानावर कायम असतात. सध्या माजलगावचे पोलीस उपअधिक्षक धिरजकुमार यांच्याकडे अंबाजोगाई विभागाचा पदभार आल्यापासून फड हे उपविभागीय पोलीस कार्यालयात कार्यरत आहे. धिरजकुमार यांच्या कर्तव्य कठोरपणाचा गैरफायदा घेत फड हे सर्वसामान्यांना गुन्हा दाखल करण्याबाबत धमकावतात, पैसे उकळतात. अशा अनेक तक्रारी येत असून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या पोलीस कर्मचार्याची चौकशी करून त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
एसपी साहेब, फडची फडफड बंद करा
कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह कर्तव्य कठोर धिरजकुमार यांच्या नावाचा गैरफायदा उठवत सर्वसामान्यांना दाबदडप करणारा पोलिस कॉन्स्टेबल फड यांची बदली होत नाही. वरिष्ठ आशीर्वाद आहेत. म्हणून हा व्यक्ती कुटाणेखोर होत चालला आहे. आता एसपी साहेबांनी निर्णय घ्यायचाय.