बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये 2022 या वर्षात 220 शेतकर्यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष काही योजना राबवण्यात येत नसल्यामुळेच शेतकर्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या.
कर्जबाजारी, नापिकी व इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करू लागले. राज्य आणि केेंद्र सरकार शेतकर्यांसाठी थातूरमातूर योजना राबवत आहेत. या योजनेतून शेतकर्यांना म्हणावा तेवढा आर्थिक लाभ होत नाही. आतापर्यंत अनेक वेळा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला मात्र तरी देखील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. 20 वर्षांपुर्वी सर्वाधिक आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या. त्यानंतर मात्र आत्महत्यांचा आकडा मराठवाड्यामध्ये वाढू लागला. राज्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 2022 साली 220 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे.