शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट
बीड (रिपोर्टर)नवोदय विद्यालय प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याय विरुद्ध आवाज उठवत प्रवेश प्रक्रियेत ई डब्ल्यू एस आरक्षणासंदर्भात योग्य ते बदल करून समाजास न्याय द्याव्या यासाठी शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांची भेट घेतली.
देशातील केंद्र सरकारने सन 2019 मध्ये 103 व्या घटनादुरूस्तीने ईडब्ल्यूएस आरक्षण कोटा लागु केला होता. संविधानाच्या कलम 15 आणि 16 नुसार शिक्षण आणि नौकरीमध्ये आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना हे आरक्षण लागु केले आहे. त्यानंतर मा. सर्वोच्य न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यु.यु. ललित यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनापिठाने दि. 07 नोव्हेंबर 2033 रोजी हे आरक्षण कायम केले आहे. या बाबतीत नवोदय विद्यालयातील इयत्ता 6 वीच्या प्रवेशा परिक्षासंदर्भात जाहिरात प्रसिध्द झालेली आहे. यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलेले नाही. तरी मा. साहेबांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाची तात्काळ प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधीत सर्व यंत्रणेला निर्देश देवून ईडब्ल्यूएस कोटयातील विद्यार्थ्यांना दिलास मिळवुन दयावा हि विनंती शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. हे आरक्षण लागू नसल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे हे शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिले. शिवसंग्रामच्या मागणीची दखल घेत शिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या सचिवशी संपर्क करून नवोदय विद्यालयाच्या प्रवेशा-संदर्भात निघालेल्या जाहिरातीत योग्य ती कारवाई करून बदल करण्यात येईल अशी ग्वाही दिली.