बीड (रिपोर्टर) शेतकर्यांच्या हितासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. सिंचनक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शेततळे बांधली जात आहेत. यंदाही राज्यभरात 13 हजार 500 शेततळे उभारण्यात येणार असून बीड जिल्ह्यात 630 शेततळे बांधण्यात येणार आहेत. प्रति शेततळ्यास 75 हजार रुपये मिळणार आहेत.
राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषीसिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी शंभर कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले. अनुदानाची मर्यादा 25 हजार रुपयांनी वाढवून प्रति शेततळे 75 हजार रुपये करण्यात आले. चालू वर्षात 2022-23 या वर्षाकरिता 13 हजार 500 वैयक्तिक शेततळे पुर्ण करण्याचे उद्दीष्ठ शासनाने ठेवले आहे. बीड जिल्ह्यामध्ये 630 शेततळ्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. शेततळ्यासाठी महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. सिंचनक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीकोनातून दरवर्षी शेततळे बांधण्यात येत आहेत.