बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त सकाळी सूर्याचे पहिले किरण पडताचा हजारोंच्या साक्षीने शासकीय महापूजाची सुरुवात झाली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व आश्वास पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची पूजा आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, न.प. मुख्याधिकारी सौ.निताताई अंधारे यांच्या शुभहस्ते महापूजन करून भगवा ध्वज फडकविण्यात आला.
याप्रसंगी मावळे,ढोल ताशा, तुतारी पोलीस बँडने जिजाऊ गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर पोलीस बँडने राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. यानंतर जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ-मुंडे, आ संदीप क्षीरसागर माजी आ.सय्यद सलीम , यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा न्यायालयात वकील संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सायंकाळी पाच ते दहा या वेळेत विविध कला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आले असून महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांना बसण्याचे विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे असे उत्सव समितीने सांगितले या शासकीय महापूजेस प्रशासकीय सेवेतील अधिकारी,पदाधिकारी, बीड शहर वकील संघ, विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्ती सार्वजनिक शिवजयंती चे अध्यक्ष शाहिनाथ परभणे, उपाध्यक्ष शेख वकील सर, सचिव विशाल तांदळेसह पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी हजारो महिलाभगिनी आणि नागरिक, पदाधिकार्यांसह ही शासकीय महापूजा संपन्न झाली.