बीड (रिपोर्टर) दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. आज सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान बीड तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. या पावसामुळे ज्वारी, आंबा, गहू, हरभरा यासह टरबुज, खरबुज इतर पिकांचे नुकसान झाले. मार्च महिन्यामध्येच अवकाळी पावसासह गारा पडल्या होत्या. त्याचे पंचनामे झाले नाही तोच पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले.
शेतकर्यांना सतत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. या पावसाने मराठवाड्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले. त्याची अद्याप नुकसान भरपाई घोषीत झाली नाही तोच दोन दिवसांपासून मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला. आजही सकाळी नऊच्या दरम्यान बीड तालुक्यासह इतर ठिकाणी चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे आंबा, ज्वारी, गहू, हरभरा, खरबुज, टरबुज, भाजीपाल्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.