बीड (रिपोर्टर) श्रीक्षेत्र भगवानगड येथे नियोजीत माऊली मंदिरासाठी जिल्ह्यातूनच नव्हेतर जिल्हाबाहेरून भक्तगण मोठ्या प्रमाणावर देणगी देत असून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या अकोला येथील ग्रामस्थांनी तब्बल 75 लाख रुपयांची देणगी दिली आहे. अकोला येथील अखंड हरिनाम सप्ताहा सुरू आहे. त्या दरम्यान ही देणगी देण्यात आली.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात असलेल्या अकोला येथे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. काल सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनाची सेवा भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. नामदेव शास्त्री यांच्या हरिकीर्तनाने झाली. या दरम्यान अकोलाकरांनी भगवानगडासाठी 75 लाख रुपयांची देणगी ह.भ.प. नामदेव शास्त्र यांच्याकडे स्वाधीन केले. भगवानगडावर ज्ञानेश्वर माऊलींचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गावागावातून मोठ्या प्रमाणावर देणगी भक्तगण देत आहेत. बीड, नगर पाठोपाठ आता जालना जिल्ह्यातूनही मंदिर उभारण्याकामी भक्तांचा हातभार लागला जात आहे.