अंबाजोगाई (रिपोर्टर) अंबाजोगाई नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण आज जाहीर करण्यात आले. शहरात एकूण 15 प्रभाग असून त्यात 31 सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी हे आरक्षण जाहीर केले आहेत. अंबाजोगाईत एकूण 15 प्रभाग असून 31 सदस्य निवडून द्यायचे आहेत. या 31 सदस्यात 16 महिला आणि 15 पुरुष असतील. प्रभाग 1 ते 14 पर्यंत प्रत्येक प्रभागात 1 महिला आणि 1 पुरुष तर प्रभाग 15 मध्ये 2 महिला आणि 1 पुरुष सदस्य असेल. अनुसूचित जातीसाठी 5 जागा आरक्षित असून त्यापैकी 3 महिला असणार आहेत. प्रभागनिहाय आरक्षण खालील प्रमाणे-
प्रभाग 1 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 2- अ महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 3 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 4 अ अनुसूचीत जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 5 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 6 अ महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 7 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 8 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 9 अ महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 10 अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 11 अ अनुसूचित जाती ब महिला, प्रभाग 12 अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग 13 अनुसूचित जाती ब सर्वसाधारण, प्रभाग 14 महिला ब सर्वसाधारण, प्रभाग 15 अ अनुसूचित जाती महिला ब महिला, क सर्व साधारण अशा पद्धतीने आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.