अनेक मातब्बरांच्या प्रभागांवर गंडा, काहींची शोधाशोध तर काहींना दुग्धशर्कर योग
बीड (रिपोर्टर) ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबीत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने दिल्यानंतर आज राज्यभरातील नगरपालिका प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. आज सकाळी बीड, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर या चार पालिकांचे आरक्षण घोषीत झाले आहेत. सदरील हे आरक्षण त्या त्या पालिकेच्या प्रमुख अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
बीड नगरपालिकेत 52 पैकी 6 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव
बीड (रिपोर्टर) बीड नगरपालिकेचे प्रभागनिहाय नगरसेवक पदाची आरक्षण सोडत आज सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप यांच्या उपस्थितीत काढण्यात आल्या असून 52 नगर सेवकांपैकी 6 जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव सोडतीत काढण्यात आल्या आहेत. पैकी 3 महिला आणि 3 सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.
आज राज्य सरकारने नगरपालिकेतील आरक्षण सोडत जाहीर केली होती. त्या अनुषंगाने बीड नगरपालिकेच्या अनुसूचित जाती आणि महिलांची आरक्षण सोडत काढण्यात आली. 52 पैकी 26 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून 26 जागा सर्वसाधारण सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी प्रभागनिहाय आरक्षण असे – प्रभाग क्र. 1 (अ) महिला सर्वसाधारण, (ब) सर्वसाधारण प्रभाग क्र. 2 (अ) सर्वसाधारण महिला, 2 ब सर्वसाधारण, 3 अ अनुसूचित जाती महिला, 3 ब सर्वसाधारण, 4 अ अनुसूचित जाती महिला, 4 ब सर्वसाधारण, 5 अ सर्वसाधारण महिला, 5 ब सर्वसाधारण, 6 अ सर्वसाधारण महिला, 6 ब सर्वसाधारण, 7 अ सर्वसाधारण महिला, 7 ब सर्वसाधारण, 8 अ सर्वसाधारण महिला, 8 ब सर्वसाधारण, 9 अ सर्वसाधारण महिला, 9 ब सर्वसाधारण, 10 अ सर्वसाधारण महिला, 10 ब सर्वसाधारण, 11 अ सर्वसाधारण महिला, 11 ब सर्वसाधारण, 12 अ अनुसूचित जाती महिला, 12 ब सर्वसाधारण, 13 अ अनसिूचित जाती सर्वसाधारण, 13 ब सर्वसाधारण महिला, 14 अ अनुसूचित जाती, 14 ब सर्वसाधारण महिला, 15 अ सर्वसाधाण महिला, 15 ब सर्वसाधारण, 16 अ सर्वसाधारण महिला, 16 ब सर्वसाधारण, 17 अ सर्वसाधारण महिला, 17 ब सर्वसाधारण, 18 अ सर्वसाधारण महिला, 18 ब सर्वसाधारण, 19 अ सर्वसाधारण महिला, 19 ब सर्वसाधारण, 20 अ सर्वसाधारण महिला, 20 ब सर्वसाधारण, 21 अ सर्वसाधारण महिला, 21 ब सर्वसाधारण, 22 अ सर्वसाधारण महिला, 22 ब सर्वसाधारण, 23 अ सर्वसाधारण महिला, 23 ब सर्वसाधारण, 24 अ सर्वसाधारण महिला, 24 ब सर्वसाधारण, 25 अ सर्वसाधारण अनुसूचित जाती, 25 ब सर्वसाधारण महिला, 26 अ सर्वसाधारण महिला, 26 ब सर्वसाधारण
अशा प्रकारची बीड नगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी पिठासन अधिकारी जगताप यांना सहकार्य केले.