बीड(रिपोर्टर): तालुक्यातील चौसाळा येथील अनंतराव दादा चौधरे यांचे नातू डॉ.अभिजीत चंद्रकांत चौधरे यांनी राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेंगलूरू,कर्नाटक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एम. डी.(मेडिसीन)पदव्युत्तर परीक्षेत घवघवीत यश संपादन करत एम. डी. जनरल मेडिसीन पदवी संपादन केली आहे.
डॉ. अभिजीत चौधरे बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील मूळ रहिवाशी असून प्राथमिक शिक्षण चौसाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले आहे व डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथून त्यांनी एम. बी. बी.एस.ची पदवी संपादित केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, गणेश अण्णा झगडे, नारायणराव गोरे, प्रा.प्रशांत झरेकर,आरोग्य उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे, सिव्हिल सर्जन डॉ. सूर्यकांत साबळे,डॉ. राठोड, डॉ. चिंचोले, डॉ. विजय इंगळे, डॉ. भोपळे, डॉ. राऊत, डॉ. रविकांत चौधरे, डॉ. राजश्री चौधरे यांच्यासह डॉक्टर असोशीयशन बीड व समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.