बीड (रिपोर्टर): पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव राज्य महामार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गावकर्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये सरपंचासह गावातील नागरीकांचा सहभाग आहे.
पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव राज्य महामार्ग दोन टप्प्यात मंजूर झालेलाआहे. त्यापैकी पहिला टप्पा पाडळसिंगी-पाचेगाव, कुक्कडगाव-वडगावगुंदा, पिंपळनेर, ताडसोन्ना, ढोरवाडी, वडवणी असा मंजूर झालेला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 31 जानेवारी 2023 रोजी 145 कोटी रुपयांची निविदा निघाली. तेव्हापासून आजपर्यंत त्या निविदेचे काय झाले? प्रत्यक्ष वर्कऑर्डर कधी निघणार व कामास कधी सुरुवात होणार? असा प्रश्न उपस्थित करत तात्काळ काम करण्यात यावे या मागणीसाठी गावकर्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या वेळी कुक्कडगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, देवीदास वाणी, नंदु शिंदे, योगेश नवले, नागरगोजे मधुकर, जाधव सुनिल, रामप्रसाद गाडे, भीमराव नवले, रणजीत शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानोबा जामकर, नाना खंडागळे, मधुकर नागरगोजे, वैजिनाथ गव्हाणे यांच्यासह आदींचा सहभाग आहे.