बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये दोन वर्षांपासून पीएम किसान योजनेअंतर्गत जी नोंदणी प्रक्रिया करण्यात येते ती बंद आहे. याच्या पूर्वी ज्या अल्प भू धारक शेतकर्यांनी नोंदणी केली आहे त्यांनाच यातून महिन्याकाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे प्रत्येकी एक हजार रुपये मिळतात मात्र गेल्या दोन वर्षात जे नव्याने शेतकरी निर्माण झाले आहेत अशा शेतकर्यांची पीएम किसान योजनेचे नोंदणी पोर्टल बंद आहे त्यामुळे त्यांना केंद्र सरकार अणि राज्य सरकारकडून मिळणारे सन्मान निधन मिळत नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत तात्काळ पोर्टल सुरू करून नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.