बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधान-कारक पाऊस पडला नाही. आजपर्यंत जो पाऊस पडला त्या पावसात सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पेरण्यात झाल्या. ज्यांनी पेरण्या केल्या त्यातील बहुतांश शेतकर्यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. बोगस बियाणांमुळे शेतकर्यांना हा आर्थिक फटका बसला असल्याचे सांगितले जाते. काहींना पुन्हा दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. बोगस बियाणे रोखण्यात कृषी विभाग सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीनची बियाणे उगवले नव्हते, यंदाही कापूस आणि सोयाबीनचे बियाणे बहुतांश ठिकाणी उगवले नाही.
मराठवाड्यात दरवर्षी सोयाबीन आणि कापसाचा पेरा जास्त प्रमाणात होतो. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. आजपर्यंतच्या झालेल्या पावसामुळे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पेरण्या झाल्या. पेरण्या झालेल्या शेतकर्यांचे बहुतांश ठिकाणी बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. या शेतकर्यांना आता पुन्हा दुबारपेरणी करावी लागणार आहे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन उगवले नव्हते. यंदा सोयाबीनसह कापसाचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांच्या आहेत. दरम्यान कृषी विभाग बोगस बियाणांबाबत तितके दक्ष नसल्याचे दिसून येत आहे.