किरीट सोमय्या हे नाव महाराष्ट्रसाठी नवे नाही. अवघ्या देशाला परिचीत असलेले सोमय्या काल उघडे नागडे आणि भोंगळे दिसले. ज्या सोमय्यांकडे भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळ म्हणून पाहितले जात होते त्यांच्याच अंतर्मनातले काळे कारनामे उभ्या महाराष्ट्राने पाहितले. लाज, लज्जा, शरम गुंडाळलेले सोमय्या ए ग्रेड चित्रपटाच्या नायकाला लाजवील, असे जिभाळ्या चाटताना दिसले तेव्हा उभ्या महाराष्ट्राला पुन्हा प्रश्न पडला, जे जे नागवे होतात, महिलांची इज्जत करत नाहीत, महिलांसोबत लगट करतात, महापुरुषांबाबत अभद्र बोलतात ते ते भाजपाचेच कसे? संस्कार, संस्कृती याचा ढोल बडवणारे आपल्या उघड्या टिर्री दाखवतात तेव्हा अशांना कटाक्षाने मुक्या माजाचे म्हणावे, अशा जळजळीत आणि संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.
सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबाबत अपशब्द वापरणारे राज्यपाल भाजपाचे, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य करणारा नगरचा भामटा भाजपाचा, सीमेवर डोळ्यात तेल ओतून अखंड हिंदुस्तानचे रक्षण करणार्या भारतीय सैनिकांच्या पत्नींबाबत वक्तव्य करणारा परिचारक भाजपाचाच. जाहीर मिरवणुकीमध्ये एकमेकांची पप्पी घेणारे भाजपाचे, मुलींशी लगट करणारे मंत्री भाजपाचे, जो जो चावटपणा, अश्लाग्यपणा, सेक्सस्कँडल जेव्हा जेव्हा बाहेर आले तेव्हा तेव्हा त्यात भाजपाचे नागवे नमुने उभ्या महाराष्ट्राने पाहिले. भाजप हा संस्कारात वाढलेला पक्ष आहे, भाजप भारतीय संस्कृतीशी एकनिष्ठ आहे, असे सातत्याने म्हटले जाते. दुर्दैवाने त्याच भाजपाचे नागवेपण सोमय्या सारख्या व्यक्तीच्या माध्यमातून समोर येते. किरीट सोमय्या हे भाजपाचे ताठर आणि विरोधकांसाठी एक जबरदस्त हत्यार म्हणून महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले. त्यांच्या त्या भ्रष्टाचार विरोधी भूमिकेचे जनतेनेही स्वागत केले. केवळ भाजपाला नडणार्या लोकांच्या विरोधात ते भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडे करायचे. भाजपातला भ्रष्टाचार साक्षात्काराने स्वीकारायचे. त्यामुळे सोमय्या टिकेचे धनीही झाले. असो, सोमय्या आणि भाजपाची संस्कार-संस्कृती ही वांझेने गरोदर असल्यासारखे दाखवणे आहे. इथे जगद्गुरू संत तुकोबा अशा चावटी शब्दज्ञानांबद्दल म्हणतात,
वांझेने दाविले गर्हवार लक्षणं
चिरगुटे घालून वाथयाला
तेवी शब्दज्ञानी करती चावट
ज्ञान पोटासाठी विकुनिया
बोलाचीच कडी बोलाचाच भात
जेवुनिया तृप्त कोण झाला?
कागदी लिहिता नामाची साकार
चाटीता मधुर गोडुनिधी
तुका म्हणे, जळो जळो ती महंती
नाही लाज चित्ती निसुगाला
एखादी वांझ बाई ओटी पोटावर चिंद्या चिरगुटे गुंडाळून आपण गरोदर असल्याचे भासवत असली तरी ते व्यर्थ आणि निरर्थक म्हणावे लागेल. एखादा शब्दज्ञानी कंटाळवाणी
बडबड करत असेल, स्वत:ला शहाणा समजून लोकांना अतिशहानपणाच्या गोेष्टी सांगत असेल तर ते व्यर्थच. बोलाचीच कडी अन् बोलाच्याच भाताने पोट भरत नाही. एखाद्या कागदावर साखर लिहिले आणि ती चाटली तर त्याची जिभेला गोडी कळणार आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, वरुण देखावा निर्माण करणारे आणि अंत:करणात स्वार्थ आणि कामाला अधिष्ठाण देणार्या अशा मोठेपणाला आग लागो. या कोडग्या आणि निर्लज्ज लोकांच्या चित्तात लाज नावाची गोष्ट नसते. होय, सोमय्या सारख्या व्यक्तींना लाज आहे का? उघडे-नागडे कित्येक व्हिडिओ महाराष्ट्राच्या वड्यावगळीतून घराघरात पोहचले. नखशिखांत ‘लव’दिसले तरी हा बहाद्दर म्हणतो, मी कुठल्या महिलेला छडले नाही, धोका दिला नाही याची चौकशी करा, अबे तू नागवा तर झाला ना! टिर्या तर उभ्या महाराष्ट्राला दाखविल्या ना, तुझे हावभाव कामातूर झालेल्या श्वानाप्रमाणे उभ्या महाराष्ट्राने पाहिले ना, थू…थू.. छी..छी… आजच्या कटाक्षातून ज्यांना चारित्र्य आहे अशांनी छत्रपतींचे आणि समाजसुधारकांचे नाव घ्यावे, भाजपाचे चारित्र्य अशा व्यक्तींच्या माध्यमातून उभा देश जेव्हा पहातो तेव्हा भाजपाचा कार्यकर्ता तर सोडा उभा प्रदेश लज्जीत होतो. किरीट सोमय्याचे कालचे व्हिडिओ पाहिल्यानंतर वय झालेल्या सोमय्याची कामइच्छा एखाद्या लुच्च्याप्रमाणे वाटते. सोमय्याचा ‘गोट्या’चा खेळ जगासमोर आल्यानंतर आता भाजप या नागवेपणाला कसे सामोरे जाणार? आणि काय उत्तर देणार ? हे पहावे लागेल.