विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांचे आंदोलन
विधिमंडळात शेतकर्यांबाबत आक्रोश; पेरणीसाठी दहा हजार देण्याची मागणी
मुंबई (रिपोर्टर): ‘उलट्या काळजाच्या, थंड रक्ताच्या केंद्र सरकारचा धिक्कार’, अशा आशयाचे फलके घेऊन विधान भवनाच्या पायर्यांवर विरोधी आमदारांनी भाजप आणि केंद्र सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केले. मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारावर आधी चर्चा करा, अशी मागणी लावून धरत विधिमंडळातही प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळी काही काळ गदारोळ निर्माण होऊन विरोधकांनी अखेर सभात्याग केला. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकर्यांची वस्तूस्थिती गंभीर असून केंद्रेकरांचा अहवाल हा अत्यंत महत्वाचा आणि धक्कादायक आहे. त्यामुळे शेतकर्यांना दहा हजार रुपये पेरणीसाठी रोखीने मदत करण्याची मागणी एकनाथ खडसेंसह अन्य विरोधकांनी केली.
मणिपूरमध्ये महिलांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली. त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहावयास मिळाले. संतप्त विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्यांवरच आंदोलन सुरू केले. उलठ्या काळजाच्या, थंड रक्ताच्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अशा आशयाचे फलके हातात घेतले. विधिमंडळामध्ये या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. मात्र सत्ताधारी या प्रकरणी चर्चा करत नसल्याचे पाहून विरोधकी पक्ष नेत्यांनी आणि विरोधी आमदारांनी सभात्याग केला. मणिपूरमधील घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळात पहावयास मिळाले. देशात नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली असल्याचा आरोप आ. वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांनी केला. तर दुसरीकडे शेतकर्यांच्या प्रश्नावर आज पुन्हा विरोधक आक्रअमक झाल्याचे पहावयास मिळाले. मराठवाड्यामध्ये एक लाखाहून अधिक शेतकरी हे आत्महत्येच्या तयारीत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आल्यानंतर विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधार्यांना धारेवर धरले. एकनाथ खडसे यांनी शेतकर्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये देण्याची मागणी केली.