तालुक्यातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरून मणिपूर सरकारचा केला निषेध
आष्टी ( रिपोर्टर):-मणिपूरमध्ये जमावाकडून 2 महिलांना नग्न करून धिंड काढून व्हिडिओ करण्यात आला या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्या वतीने आष्टी तालुक्यातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरून मणिपूर सरकारचा निषेध नोंदविण्यात आला
मणिपूरच्या घटनेने देशात संतापाची लाट उसळली आहे.
त्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली या मानहानीकारक घटनेच्या निषेधार्थ दोषींना मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात यावी तेथील निष्क्रिय सरकार बरखास्त करावे, निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्या वतीने शेकडो अंगणवाडी सेविका महालांनी एकत्र रस्तावर उतरून दि.25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एकात्मिक बालविकास कार्यालयापासून निषेधार्थ फलक हातात घेऊन मोर्चा काढण्यात आला यावेळी मणिपूर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला यावेळी यावेळी प्रा गनीभाई तांबोळी, आशा शेंडगे ,शोभा साठे, नसिंम सय्यद,उषा राऊत,रत्नमाला लाहोर,आशा वखरे,अलका सानप,रामकवर भोगाडे,संगीता गरुड सुशीला बांगर, मथुरा कुत्तरवाडे,आर बी लोहार, रेश्मा चौधरी, वैशाली सुंबरे, सविता थोरवे, बिबी बेग,कुसुम थोरवे, यांच्यासह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या.