रिपाइं महिला आघाडीने केले आंदोलन
प्रा. मोराळेंसह आदी कार्यकर्त्यांनी केला निषेध
बीड (रिपोर्टर): मणिपूर राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. मे महिन्यात दोन महिलांना नग्न करून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज रिपाइंच्या वतीने युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. दरम्यान, प्रा. सुशिला मोराळे यांच्या वतीनेही या घटनेचा निषेध करण्यात आला.
मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये दोन महिलांवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या घटनेने देशभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन रिपाई युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. महिला आघाडीच्या माया मिसळे यांनी केले. या वेळी महिला कार्यकर्त्यांसह किसन तांगडे, राजू जोगदंड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. तर प्रा. सुशिला मोराळे यांच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मणिपूर घटनेप्रकरणी तीव्र निदर्शने करण्यात आले. या वेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी प्रा. मोराळे यांनी केली आहे.