डॉ. नरेंद्र काळेंच्या प्रखर विरोधानंतर कुलगुरुंची माघार
बीड (रिपोर्टर): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने असलेल्या विद्यापीठामध्ये वास्तूशास्त्र व न्यूमेरोलॉजी हा पदव्यूत्तर अभ्यासक्रम समावेश करून शुभ-अशुभ, दिशा-भाग्यांक इत्यादी भंपक व अवैज्ञानिक गोष्टींचा समावेश करत तो अभ्यासक्रम संभाजीनगर, जालना, बीड या ठिकघाणी प्रस्तावित करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाला पदव्यूत्तर सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी पदविधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी प्रखर विरोध करून सदरचा अभ्यास ब्रहआराखड्यातून वगळण्यास विदद्यापीठाला मजबूर केले. विद्यापीठाच्या या कृतीचा निषेधही काळे यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुढील पाच वर्षाचा ब्रह्तआराखडा अधिसभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यामध्ये वास्तूशास्त्र व न्यूमेरॉलॉजी या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला होता. सदरचा अभ्यासक्रम हा धक्कादायक असल्याने सिनेट सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी प्रखर विरोध केला. सदरच्या अभ्यासक्रमाला तांत्रिक अथवा वैज्ञानिक आधार नाही. हा विषय भविष्य या विषयासारखाच शुभ अशुभ, भाग्यांक, भंपक, अवैज्ञानिक गोष्टींवर आधारीत आहे. अंधश्रध्देला खतपाणी घालणारा प्रतिगामी अभ्यासक्रमाचा विद्यापीठाच्या ब्रह्त आराखड्यामध्ये समावेश होणे हे निराशाजनक असल्याचे सांगत काळे यांनी याला जोरदार विरोध केला. कुलगुरुंच्या या कृतीचा निषेध करत उत्कर्ष पॅनलच्या सर्व सदस्यांनी प्रचंड गोंधळ करून मतदानाची मागणी केली. त्यानंतर सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेत कुलगुरुंनी हा अभ्यासक्रम ब्रह्तआराखड्यातून वगळण्याचा निर्णय घेतला.