बीड (रिपोर्टर): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा लिंबागणेश येथे आज सकाळी निषेध करत पुतळा जाळला. या वेळी संभाजी भिडेला अटक करण्याची मागणी करण्यात आली. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
संभाजी भिडे याने महात्मा गांधींबद्दल निंदनीय वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा ठिकठिकाणी जाहीर निषेध होत आहे. लिंबागणेश येथे संभाजी भिडेचा पुतळा जाळून घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी या वेळी भिडेच्या पुतळ्याला जोडे मारले. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत राज्यपाल, गृहमंत्री मुख्यमंत्री, प्रधान सचिव यांना देण्यात आले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्य दामू काका थोरात, आंबेडकरवादी नेते रवि बापु निर्मळ, सुरेश निर्मळ, लेहनाजी गायकवाड, पांडुरंग वाणे, विनायक मोरे, अशोक जाधव, विक्रांत वाणी, अभिजीत गायकवाड, रामचंद्र मोरे, अजय थोरात, तुकाराम गायकवाड, कृष्णा वायभट यांच्यासह आदींची उपस्थिती होती.