आष्टी ( रिपोर्टर ):- तालुक्यातील टाकळी ते नांदा जाणारा रस्ता खोदून अडवण्यात आला आहे.खोदलेला रस्ता पूर्ववत करून देण्याच्या मागणीसाठी जिथे रस्ता खोदला तिथेच महिला, पुरुष,लहान मुले, शालेय विद्यार्थी, वयोवृद्धांचे आज दि.31 जुलै रोजी आमरण उपोषण सुरू झाले असून आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
तालुक्यातील टाकळी अमिया ते नांदा जाणार पुर्वीपार वहिवाटाचा रस्ता अडवला असून तो खुला करून देण्यात यावा या रस्त्यावरून 70 ते 80 शेतकर्यांना ये जा करावी लागत असून हा रस्ता तात्काळ पूर्ववत करून देण्याच्या मागणीसाठी सर्व ग्रामस्थांनी दिनांक 31 जुलै रोजी जिथे रस्ता अडवला आहे तेथे सर्व लहान मुले वयोवृद्ध महिला सहित आमरण उपोषण करण्यात येत आहे रस्ता पूर्ववत करण्यात येईल तेव्हाच उपोषण मागे घेण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.यावेळी सरपंच सावता ससाणे, उपसरपंच नारायण चौधरी, माजी सरपंच काकासाहेब चौधरी, कचरू तात्या भुकान ,उद्धव चौधरी, अंबादास चौधरी, बंडू चौधरी, नामदेव चौधरी ,साहेबराव चौधरी रावसाहेब चौधरी ,महादेव चौधरी, गोरख चौधरी ,नवनाथ चौधरी, सोमनाथ चौधरी ,रघुनाथ चौधरी गेनबा चौधरी, संजय शितोळे, सतीश सातपुते ,शिवाजी चौधरी किसन चौधरी, ताराबाई चौधरी, शितल चौधरी रमाबाई चौधरी, पूजाबाई चौधरी, सीमा चौधरी, उषाबाई शितोळे ,रखमाबाई चौधरी मच्छिंद्र ससाने नीता, बाई चौधरी, हिराबाई चौधरी बायजाबाई चौधरी, पांडुरंग चौधरी, औदुंबर शेळके ,मंगला चौधरी,आदी उपोषणकर्ते उपस्थित होते.