उद्या मार्गदर्शनपर मेळाव्याचे आयोजन
बीड (रिपोर्टर): युपीएससी परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचा मानस निगेबान आणि उर्दू शिक्षक संघटनेने केला आहे. या संदर्भात त्यांनी उद्या मिलिया कॉलेज या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मुजतबा अहेमद खान यांनी केले आहे. या मेळाव्यात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
बीडमधील विद्यार्थी युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावेत, या दृष्टीकोनातून निगेबान आणि महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जाणार आहे. हे क्लास मोफत राहणार आहे. पहिल्या टप्प्यात सातवी, दुसर्या टप्प्यात नववी, तिसर्या टप्प्यात अकरावी आणि चौथ्या टप्प्यात पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सदरील या मार्गदर्शनाला अलफैज जळगाव फाऊंडेशनचे राहणार आहे. या संदर्भात उद्या मिल्लिया कॉलेज या ठिकाणी सकाळी साडेदहा वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला खान सबिया बाजी, अब्दुल करीम सालार, अब्दुल खय्युम शहा, डॉ. वखार शेख, खालेद सैफुद्दीन, हारुण बशीर, एम.ए. गफ्फार हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुजतबा अहमद खान यांच्या वतीने करण्यात आले आहे.